बारामती ! वत्कृत्व स्पर्धेत स्वप्नाली मदने हिचा प्रथम क्रमांक

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
 नेहरु युवा केंद्र पुणे. (युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार) व शब्दधन सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्रीपाटी क्लासेस बारामती या ठिकाणी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भारत हा युवकांचा देश आहे युवकांचे देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण या बद्दलचे मत जाणुन घेण्यासाठी नेहरु युवा केंद्र पुणे यांच्या वतिने तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वत्कृत्व स्पर्धेत तालुक्यातील युवा युवतींनी यात सहभागी होऊन सबका साथ सबका विकास या विषयाला अनुसरून आपआपले विचार व्यक्त केले, या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ.प्रा.विजय काकडे व प्रा.विकास शिंदे यांनी काम पाहीले. या स्पर्धेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथील स्वपनाली मदणे यांनी प्रथम क्रमांक,दूतिय क्रमांक शर्मिला देवकाते व तृतीय क्रमांक मानसी सोनवणे यांना मिळाला असुन क्रमांक प्राप्त स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या स्पर्धेचे आयोजन  नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रतिनिधी वैभव भापकर तसेच शब्दधन फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा.मनोज वाबळे यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमासाठी प्रा.विनय त्रिपाटी फिरोजभाई बागवान जगन्नाथ जगताप,दिपक वाबळे,मनोज पवार राहुल तावरे आदी मान्यवार उपस्थित होते.
To Top