फ्लॅट विकण्यास परवानगी देत नाही म्हणून बायकोसह सासूवर कोयत्याने वार : गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
दुसऱ्या लग्नाला परवानगी देत नाही, फ्लॅट विकण्यास सही देत नाही म्हणून बायको आणि सासूवर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तानाजी गायकवाड या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          मिळालेल्या माहितीनुसार दि.०५/११/२०२१ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोल्हेवाडी (ता. हवेली जी. पुणे ) हद्दीत असणाऱ्या डी. एस. के. विश्व कोल्हेवाडी रोडवर - यातील आरोपी तानाजी रोहीदास गायकवाड (रा. ए. २. अबोली, फ्लॅट नं २०४ मधोबन सोसायटी कोल्हेवाडी, किरकटवाडी ता.हवेली जी. पुणे) याने त्याची पत्नी अश्विनी तानाजी गायकवाड ही फ्लॅट विकण्यासाठी सही देत नाही व दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी देत नाही या कारणावरून तिला रस्त्यात अडवुण शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्याने स्वता विष पिण्याची व अश्विनीलाही विष पाजण्याची धमकी देउन सोबत आणलेल्या कोयत्याने स्वतःच्याच पत्नीच्या डोक्यात व दोन्ही हातावर वार केले. यावेळी अश्विनीची आई तिला सोडविण्यासाठी आली असता आरोपीने तिच्याही डोक्यात व दोन्ही हातावर कोयत्याने वार करुन दोघींना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कोल्हेवाडी (ता. हवेली) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To Top