सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मु. सा. काकडे महाविद्यालयात सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2019 रोजी प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रा.डॉ. प्रमोद पवार अधिष्ठाता, मानव्यविद्याशाखा, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षण व्यवस्थेत अनेक लहान मोठे बदल होणार आहेत. संशोधनाला अधिक उत्तेजन देण्याचे सूतोवाच या शैक्षणिक धोरणात आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उच्च शिक्षणात विशेषीकरण (Specialization) शिक्षणाला महत्त्व होते. परंतु त्यानंतर अलीकडील काळात आंतरविद्याशास्त्रीय अध्ययनाकडे आपण वळलो आहोत. कला, विज्ञान, वाणिज्य, आरोग्य, तंत्रज्ञान या शास्त्रांचे अध्ययन करताना आपल्याला इतरही आवडीच्या विषयाचे अध्ययन, संशोधन करण्याची संधी मिळणार आहे व हे अध्ययन करताना आपणाला इतरही आवडीच्या विषयांचे अध्ययन, संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. हे अध्ययन बहुशास्त्रीय स्वरूपाचे असणार आहे. यामध्ये मानव्यविद्याशाखेला अधिक वाव मिळेल अशा प्रकारचे मत आपल्या व्याख्यानातून डॉ. प्रमोद पवार यांनी व्यक्त केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा जवाहर चौधरी यांनी संशोधन पद्धती व त्याची विविध अंगे, त्यांची तत्त्वे समजून घेणे हे महत्त्वाचे ठरेल असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सहसचिव श्री. सतीश लकडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे, डॉ.जया कदम, डॉ.प्रवीण ताटे-देशमुख, प्रा. रजनीकांत गायकवाड आवर्जून उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ. बाबासाहेब मरगजे, प्रा.अच्युत शिंदे, प्रा.डॉ.देविदास वायदंडे, प्रा.डॉ.नारायण राजुरवार, प्रा.पोपट जाधव, प्रा.डॉ.राहुल खरात, प्रा.डॉ.अजय दरेकर, प्रा.डॉ.दत्तात्रय डुबल, प्रा.आदिनाथ लोंढे, प्रा. कुलदीप वाघमारे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक डॉ. निलेश आढाव यांनी केले तर आभार IQAC चे समन्वयक डॉ. संजू जाधव यांनी मानले.
COMMENTS