खटाव ! डिकसळ गावातील सुमारे दोनशे वर्षापूर्वीचे कारीचे झाड : पर्यावरण तज्ञ डॉ महेश गायकवाड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बोर आणि कारी अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची झाडे काटेरी शुष्क कमी पावसाच्या भागात आढळून येतात. बोर कार अशी नावे असलेली झाड काटेरी असून याना फळे येतात, आपण पिकलेली फळे आवडीने खातो. पोटातील अनेक आजार , कृमी नष्ट करण्याचे काम ही आंबट गोड फळे करीत असतात. शिवाय यांचा कोवळा पाला दात मजबुत व्हावेत म्हणून आजही खातात. 
कारीचे एवढे मोठे व जुन झाड मी तरी पहिल्यांदाच पाहिले, खरतर गोडसे कुटुंबातील सर्वांना परिचित असणार हे झाड. कारण घरातील लहान ते थोरापर्यंत हे झाड ओळखीचे. दररोज याची पुजा केली जाते, यामुळे झाडाखाली मुंग्यांना साखर मिळते शिवाय सरड्याना मुंग्या हीच तर अन्नसाखळी असते. 
गोडसे कुटुंबातील महिला या झाडाला मकर संक्रांतीत औवसणे करतात. सदर बाब धार्मिक आहे मात्र यात या झाडाचे संगोपन केले जात आहे, म्हणून आपले सण डोळसपणे साजरी करणारी जुनी पिढी महान आहे. आपण मात्र शिक्षित होऊन मंद होत चाललोय का असा प्रश्न सर्वांनी स्वतःला विचारणे गरजेचे आहे. गोडसे कुटूंबानी हा वारसा असाच पुढे चालू ठेवला पाहिजे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 
कारीच झाड काटेरी असून यावर अनेक पक्षी घरटी करतात, शिवाय रात्रभर निवऱ्याला बसतात. असंख्य कीटक आपली मिलनाची जागा म्हणून या झाडाला शोधतात. मानवाने कारीची फळे खाऊन कारीला वाचविले पाहिजे, एवढंच. 
डिकसळ गावात अगदी एकांतात असणारी गोडसे कुटुंबातील वस्ती आणि तिथला पाहुणचार एकदा तरी घ्यावा असाच. भले मोठ 2 एकरचे शेततळे तेही डोंगर दर्यात. 
अगदी हाकेच्या अंतरावर संतोषगड चा ट्रेक करता येतो. इथं राहणं म्हणजे ससे, लांडगे, कोल्हे आपल्या सोबतीलच. विविध पक्षीगण, खुरट्या वनस्पती, ओढा आणि आमराई, महादेव डोंगररांगा, संतोषगड. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथली शांतता आणि गारवा. गारवा तोही महाबळेश्वर सारखाच.  इथला ओढा तर अविस्मरणीय असाच, जुनी चिंचेची झाड, भरगच्च आमराई, आणि शेततळ्यातील जिवंत मासेमारी करून लगेचच मेजवानी....
To Top