सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : प्रतिनिधी
लोणंद पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाळू चोरीच्या गुन्ह्य़ातील तीन आरोपींना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी खंडाळा यांनी तीन वर्ष कारावास व प्रत्येकी दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
लोणंद पोलिस ठाण्यात २०१८ साली गु.र.न. 312/2018 lPC 379,34 अन्वये दाखल गुन्ह्य़ातील आरोपी दीपक हणमंत वाघ वय 35 वर्षे रा,वाठार (बु) ता, खंडाळा , रोशन भीमराव थोपटे वय 27 वर्षे रा,पिंपरे (बु) ता, खंडाळा , स्वानंद सचिन जगताप वय 35 वर्षे रा,निरा ता, पुरंदर जि, पुणे या तीघांवर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी खंडाळा यांचे समोर सुनावणी होऊन गुन्हा निष्पन्न झाल्याने दिनांक १२ नोव्हेंबर रोजी प्रत्येकी तीन वर्ष कारावास व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सदर गुन्ह्याचे कामकाज सपोनि श्री. विशाल वायकर यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट कर्मचारी - पो.कॉ. 1783 तोटेवाड यांनी पाहिले. तर सरकारकडून ॲडव्होकेट महेश यादव यांनी कोर्टासमोर बाजू मांडली.