सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दिवाळीमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र समुद्र किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कमी जाणवला होता.
दिवाळीमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र समुद्र किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कमी जाणवला होता.
आता पुन्हा एकदा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस वर्तवण्यात येत आहे.
'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊसाची शक्यता
राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
---------------------
'या' राज्यात पावासाचा इशारा
हवामान विभागाने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशमध्ये पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. तसेच 17 आणि 19 तारखेला तेलंगणाच्या समुद्र किनाऱ्या लगतच्या भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.