बारामती ! निंबुत येथील तलाठी १० हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या ताब्यात

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील निंबुत येथील तलाठी मधुकर मारुती खोमणे वय ५८ हे १० हजाराची लाच स्वीकारताना त्यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
 दिनांक दि. १७/११/२०२१ रोजी तलाठी कार्यालय सजा निंबुत ता. बारामती. येथे सापळा लावण्यात आला होता. 
यातील तक्रारदार यांचे वडीलांचे नावे असलेल्या जमिनीच दुरुस्ती नोंद करण्यासाठी आरोपी लोकसेवक यानी तक्रारदार यां १०,०००/- रूपयांची लाच मागणी करून १०,०००/- रूपयांची रक्कम स्वीकारल्यावर त्यास ताब्यात घेण्यात आले असून व निंबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद कर प्रक्रीया सुरू आहे. ला. प्र. वि. पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक संदीप कऱ्हाडे तपास आहेत.
          सदरची कारवाई  पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, ला.प्र. परिक्षेत्र,  अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र. वि. पुणे व  सुहास नाडगौडा, अपर अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
         शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभ कार्यालयास ०२०-२६१२२१३४, ३६०५०४२३ या क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन  राजेश बनसोडे, पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.
To Top