भोर ! अवकाळीच्या फेऱ्याने कही खुशी कही गम : भात भिजले तर ज्वारी पिकांना जीवदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात मंगळवार दि-१६ सायंकाळी अवकाळी पावसाचा जोरदार शिडकाव झाल्याने कापणीस आलेले व कापणी केलेले भात पीक शेतात भिजून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर रब्बीतील ज्वारी पिकाला या पावसाचा चांगलाच फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम अशी अवस्था झाली आहे. 
तालुक्यातील विसगाव,चाळीसगाव खोरे, कापूरव्होळ, सारोळा, नसरापूर,महूडे,भाटघर धरणक्षेत्र,निगुडघर परिसरात म मंगळवार दिनांक १६ रात्रीच्या वेळी अचानक जोराचे वारे वाहू लागले होते.त्यातच काही वेळाने अर्धातास अवकाळी पाऊस बरसला.या पावसामुळे सद्या सुरू असलेल्या भात पिकाची कापणी केलेले भाताचे काड भिजून जाऊन उभ्या भात पिकाच्या शेतात पाणी साचले गेले.याामुुळे भातव्यान व भात  खराब होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
To Top