पुणे, दि. २४
रब्बी, उन्हाळी 2021-22 हंगामा
खरीप 2021 हंगामात महाबीज व्यवस्थापनामार्फत सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला होता. सोयाबीन पीक परिपक्वता अवस्थेत असताना मराठवाडा व विदर्भात सप्टेंबरमधे झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन बिजोत्पादनावर विपरीत परीणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील खरीप 2022 हंगामात सोयाबीन प्रमाणित बियाणे पुरवठा करण्यावर मर्यादा येणार असल्याने राज्यात सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात फुले संगम व फुले किमया वाणांचा प्रत्येकी 500 हेक्टर व 100 हेक्टरचा प्रमाणित बियाणे बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्त्रोत बियाणे डिसेंबर 2021 अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे. कृषी विद्यापिठाच्या शिफारशीनुसार 30 जानेवारीपूर्वी पेरणीचे नियोजन आहे. बिजोत्पादक शेतकऱ्यांकडे अंदाजे एप्रिल व मे महिन्यात उत्पादित झालेले पात्र बियाणे महाबीजकडून बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी बिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. बी. बोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज पुणे (9890712967/800556884) किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा