खंडाळा ! लोणंद येथे एकाच दिवशी दोन वेगवेळ्या ठिकाणी दोन आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथे दोन वेगवेगळ्या घटनांत एका विवाहीतेने व एका वृद्धाने अशा दोघांनी आत्महत्या केल्या असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. 
         लोणंद येथील शास्त्रीचौक परिसरातील वीस वर्षीय विवाहिता शुभांगी रोहन माने हिने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहीती घटनास्थळावरून मिळत आहे. शुभांगी हिचे माहेर शाहूपुरी सातारा येथील असून ती कालच माहेराहून सासरी आल्याचे समजते  घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट देऊन लोणंद पोलिसांना तपासा संदर्भात सूचना दिल्या आहेत . 
           दुसऱ्या एका घटनेत लोणंद फलटण रोडवरील बाळासाहेब नगर येथील मनोहर खरात या वृद्ध व्यक्तिनेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून सदर घटनास्थळी लोणंद पोलिस दाखल झाले आहेत.  सदर दोन्ही प्रकरणी लोणंद पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम चालू आहे
To Top