सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी तरुण सामाजिक कार्यकर्ते आनंदा रघुनाथ बढे यांची बिनविरोध निवड झाली.
बढे यांचा गावच्या विकासकामात तसेच सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग असल्याने तसेच ते तरुणांचे प्रेरणास्थान त्यांची निवड ग्रामसभेत बिनविरोध अध्यक्षपदी करण्यात आली.यावेळी सरपंच उज्वला बढे,उपसरपंच राजेंद्र चिकने,माजी तंटामुक्त अध्यक्ष मधुकर कानडे,शिवाजी पाटणे,माजी उपसरपंच अंकुश सावले,सूर्यकांत पवार,रामचंद्र दीक्षित,अनिल वीर,प्रदीप बदक,नारायण उल्हाळकर,मिलिंद म्हसवडे, संतोष म्हस्के तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.