सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडी होत महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी) लहूनाना शेलार यांची बिनविरोध निवड झाली झाल्याने सभापतीपदाची माळ शेलार यामचतच गळ्यात पडली.
भोर पंचायत समिती सभागृहात मंगळवार दि-१६ निवडणूक प्रक्रिया पीठासीन अधिकारी राजेंद्र कचरे,सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल तनपुरे यांच्या अधिपत्याखाली पार पडली.भोर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ तर शिवसेना, काँग्रेस प्रत्येकी १ अशी पदसंख्या आहे.परंतु दि-१८ फेब्रुवारी राष्ट्रवादीच्या दमयंती जाधव यांची सभापतीपदाची मुदत संपत असल्याने राष्ट्रवादी पक्षाने लहू नाना शेलार यांच्या नावाची शिफारस (व्हीप) पक्ष कार्यालयाकडे पाठविले असता पक्षाचा आदेश मानला नसल्याने सभापती दमयंती जाधव, श्रीधर किंद्रे, मंगल बोडके यांचे सदस्यपद रद्द करण्यात आले होते.त्यानुसार दि-१६ रोजी सभापती पदाची निवडणूक सुरू झाली.सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे लहूनाना शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला.त्यावर आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे रोहन बाठे यांनी सूचक म्हणून सह्या केल्या.तर शिवसेनेच्या सदस्य पूनम पांगारे यांनी ही आघाडी धर्म पाळला. सभापतिपदी लहूनाना शेलार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, शहराध्यक्ष नितीन धारणे यांनी शेलार यांचा सत्कार केला.पंचायत समिती सदस्य त्रिकुटातील शेलार सभापती झाले असल्याने सदस्य रोहन बाठे( काँग्रेस), पुनम पांगारे (शिवसेना) यापैकी कोण उपसभापती होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.