सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समिती, पुरंदर तालुका केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक सभा, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ ( कै. शिवाजीराव पाटील ), पुरंदर तालुका एकल शिक्षक सेवा मंच, पुरंदर तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटना, पुरंदर तालुका जुनी पेंशन हक्क संघटना, पुरंदर तालुका शिक्षक समिती महिला आघाडी
पुरंदर तालुका एकल सेवा मंच महिला आघाडी,
पुरंदर तालुका केंद्रप्रमुख संघटना, पुरंदर तालुका शिक्षक भारती संघटना पुरस्कृत महविकास आघाडी पॅनलच्या वतीने सर्व १५ उमेदवारांनी आज सासवड ता. पुरंदर येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी -१ सुनील जगताप यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केले .
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा पंचवार्षिक कार्यक्रम जाहीर झाला असून १२ नोव्हेंबर २०२१ ते १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शिक्षक महाविकास आघाडीच्या वतीने , अनु. जाती गटातून सुनील कांबळे , विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून अभिराज चव्हाण , इतर मागास वर्ग गटातून सुनिल जगताप , महिला राखीव गटातुन मधुबाला कोल्हे- भोंगळे , वनिता माळवदकर , सर्वसाधारण गटातून सुनील कुंजीर , अनिल चाचर , गणेश कामठे , रोहिदास कोलते , मनोज सटाले , सुरेश जगताप , गणेश लोणकर , संजय कुंजीर , बाळासाहेब सि. कुंजीर , सुनील नेवसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले .
COMMENTS