सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणी भापकर : प्रतिनिधी
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
यामध्ये लोणी भापकर (ता.बारामती) येथील कु.श्रीया तानाजी वाघ हिने ९९.७३ टक्के मिळवून देदिप्यमान यश प्राप्त केले आहे.
देशभरातील१५ लाख ४४ हजार२७५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यामध्ये हिने उत्तम रँक मिळवली आहे.
गेली दीड वर्ष ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले तरीही तिने चिकाटीने घरीच अभ्यास कायम ठेवला. त्यामुळे हे यश प्राप्त झाले. तिला पेस अकॅडमी ,(कल्याण,मुंबई) शिक्षक व आई - वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तिने सांगितले की, घरी बसून ऑनलाईन तासिका, सराव परिक्षा हे थोडे नवीन होते .परंतु जिद्द आणि समोर ठेवलेले ध्येय यश मिळवून देते. या यशामुळे लोणी भापकर पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले.