जिल्हास्तरीय चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Pune Reporter

जिल्हास्तरीय चौथ्या खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धांचे आयोजन


 

पुणेदि.१८

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा कबड्डी संघटनाजिल्हा खो-खो संघटनाजिल्हा बास्केटबॉल संघटना,  महाराणा प्रताप संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षाखालील मुला-मुलींकरीता जिल्हास्तरीय चौथ्या खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कबड्डी खेळाकरीता 65 किलो आणि  18 वर्षे खालील मुलींसाठी 23 ते 24  नोव्हेंबर 2021 रोजी तर 70 किलो आणि 18 वर्षे खालील मुलांसाठी 25 ते 26 नोव्हेंबर रोजी स्पर्धा होतील. मुलींना 23 नोव्हेंबर रोजी आणि मुलांना 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता उपस्थित रहायचे असून वजन सकाळी 8 ते 9 कालावधीत होणार आहे. मुलींसाठी निवडचाचणी 24 नोव्हेंबर तर मुलांसाठी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पुणे जिल्हा कबड्डी संघटनचे क्रीडांगणनेहरू स्टेडीयम येथे होणार आहे.

 

वरील दोन्ही स्पर्धांसाठी प्रवेशिका 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत येरवडा येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात स्वीकारल्या जातील. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (9552931119) आणि क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी (7020330435) यांच्याशी संपर्क साधावा.

 

खो-खो खेळाच्या 18 वर्षे खालील मुलींच्या स्पर्धा 23 ते 24 नोव्हेंबर रोजी तर मुलांच्या स्पर्धा  24 ते 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलींच्या स्पर्धेकरीता 23 नोव्हेंबर रोजी तर मुलांच्या स्पर्धेकरीता 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता उपस्थित रहायचे आहे. मुलींची निवडचाचणी 24 नोव्हेंबर रोजी तर मुलांची 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सन्मित्र संघ मैदान क्रीडामहर्षी हरिभाऊ साने क्रीडासंकुल कोथरुड येथे होणार आहे.

 

मुले व मुलींच्या खो-खो स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत येरवडा येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी खो-खो खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र साप्ते (9822480509) किंवा समीर चुणेकर (9764816177) यांच्याशी संपर्क साधावा.

 

बास्केटबॉल खेळाकरीता 18 वर्षाखालील फक्त मुलींच्या स्पर्धा  25 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होतील.  स्पर्धेच्या ड्रॉसाठी  21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता डेक्कन जिमखाना क्लब येथे उपस्थित रहावे. प्रवेशिकांची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 10.30 वाजेपर्यंत असून त्या secretarypdba78@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी संघटना प्रतिनीधी ललित नाहटा (9822259458) किंवा क्रीडा अधिकरी सी. एस. स्वामी (9689939421) यांच्याशी संपर्क साधावा.

 

खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी 2003 रोजीची किंवा त्यानंतरची असावी व तो 18 वर्षाखालील असावा. खेळाडूसोबत  आधारकार्ड,   इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रजन्मदाखला यापैकी दोन बाबी असणे आवश्यक राहील. ओळखपत्रावर शाळामहाविद्यालय किंवा क्रीडामंडळाच्या सही-शिक्क्यासह नोंदणी क्रमांकखेळवयोगट तसेच अलीकडील  छायाचित्र असणे अनिवार्य राहील.

 

कबड्डीखो-खो खेळाच्या स्पर्धा मातीच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेला व निवड चाचणीला उपस्थित असणाऱ्या संघ खेळाडूंनी प्रवेश अर्ज व इतर कागदपत्रासह उपस्थित रहावे. कबड्डी किंवा खो-खो संघ 12 खेळाडूंचा असावा. त्यापैकी किमान 10 खेळाडू उपस्थित राहतील. स्पर्धा खेळताना खेळाडूंनी त्या त्या खेळाचा गणवेश परिधान करणे अनिवार्य असून त्याशिवाय सहभाग घेता येणार नाही.

 

या स्पर्धा व निवडचाणीमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही प्रकाराचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. संघखेळाडू यांनी निवासभोजन व प्रवास खर्च स्वत: करावयाचा आहे. स्पर्धेसाठी उशीरा उपस्थित होणाऱ्या संघ किंवा निवडचाचणी खेळाडूंचा विचार केला जाणार नाही.

 

जिल्हास्तर स्पर्धेकरीता पुणे जिल्ह्यातीलच खेळाडूंना सहभागी होता येणार असून सहभागी झालेल्या खेळाडूंना इतर संघाकडून किंवा दुसऱ्या जिल्ह्यांकडून या खेळाच्या स्पर्धा अथवा निवडचाचणीकरीता सहभागी होता येणार नाही. स्पर्धेदरम्यान असे निदर्शनास आल्यास संबंधित खेळाडूंना व संघास 3 वर्षांकरीता बंदी घालण्यात येईल. त्यामुळे इतर कोणत्याही संघटना अथवा शासकीय स्पर्धेत सहभागी होता येणार नाहीयाची संघ व खेळाडूंनी नोंद घ्यावी. 

 

जिल्हास्तरीय स्पर्धा व निवडचाचणीसाठी जास्तीत जास्त संघ व खेळाडू यांना सहभागी व्हावे आणि जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता खेळाडूंना आवश्यक त्या कागदपत्रांसह दिलेल्या कार्यक्रमानुसार उपस्थित रहावेअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.

To Top