आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बोधचिन्ह स्पर्धेसाठी मुदतवाढ ९ डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

Pune Reporter

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बोधचिन्ह स्पर्धेसाठी मुदतवाढ ९ डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

 

            पुणे दि.१८

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र चे आकर्षक आणि विषयाशी निगडीत बोधचिन्ह तयार करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या स्पर्धेस मुदवाढ देण्यात आली असून स्पर्धेसाठी ९डिसेंबर २०२१ पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहे.

 

            यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये संचालनालयातर्फे स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. त्यात प्राप्त 400 प्रवेशिकांपैकी एकही बोधचिन्ह निकषानुसार योग्य नसल्याने ही स्पर्धा नव्याने जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी 1 नोव्हेंबरपर्यंत बोधचिन्ह सादर करावयाची होती. या मुदतीत वाढ करण्यात येऊन 9 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत.

 

            बोधचिन्ह तयार करताना क्रीडा विद्यापीठाचे उद्दीष्टध्येय आणि दृष्टीकोन लक्षात घेणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्यबळविज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साधण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र हे भारतात प्रथमच होत असल्याने त्यास जगभरातून प्रसिद्धी मिळणार आहे. या बाबी लक्षात घेता विद्यापीठाचे बोधचिन्ह आकर्षक असणे आवश्यक आहे. बोधचिन्ह स्पर्धेचे नियम व अटी शासनाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

To Top