या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण उद्या; केवळ काही सेकंदांसाठी दिसणार सर्वात मोठे खंडग्रास चंद्रग्रहण

Pune Reporter

सोमेश्वर रिपोर्टर टिम - -- - 
कोल्हापूर  
उद्या दि १९ नोव्हेंबर सुरू होणार्या चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार  सकाळी  ११ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होणार असून संध्याकाळी  ५ वाजवून ३३मिनिटांनी संपेल यापैकी खंडग्रास ग्रहणा चा कालावधी ३तास २८मिनिटे २३ सेकंदे   एवढा असणार आहे या शतकातील हे सर्वात मोठे चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान  (मध्ये)येते त्यामुळे पृथ्वी ची सूर्यप्रकाशातील सावली चंद्रावर पडते तेव्हा  चंद्र काळोखात जातो व चंद्रग्रहण चालू होते हे ग्रहण भारतामधून दिसणार नसून मात्र भारतामध्ये अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही भागामध्ये अल्पकाळासाठी (सेकंद ) छाया ग्रहण पाहावयास मिळू शकते  ज्योतिष शास्त्रामध्ये छायाकल्प  ग्रहणाला  ग्रहणाचा दर्जा दिला जात नसतो उत्तर  व दक्षिण  अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये खंडग्रास पध्दतीने ग्रहण पाहावयास मिळू शकते .
यापूर्वी एवढे मोठे चंद्रग्रहण  १८फेबु्रवारी  १९४० दिसले होते यानंतर एवढ्या मोठ्या कालावधी ने खंडग्रास पध्दतीचे चंद्रग्रहण  ८ फेबु्रवारी २६६९  साली पाहावयास मिळू शकेल उद्या १९नोव्हेंबर रोजी होणार्या चंद्र ग्रहणामध्ये पृथ्वीच्या सावलीने चंद्र  ९९ टक्के झाकला जाणार आहे  अशी माहिती खगोलशास्त्रज्ञ प्रा.डॉ मिलिंद कारंजकर ,कोल्हापूर यांनी दिली आहे
To Top