सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या उत्तरेकडील दुर्गम डोंगरी भागातील भाटघर धरणग्रस्तांच्या नागरी सुविधांसाठीे १९ कोटी ३७ लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार थोपटे यांच्या अथक प्रयत्नातून भाटघर धरणग्रस्तांच्या १०३ कामांपैकी ४९ कामांना पहिल्या टप्प्यात १९ कोटी ३७ लाखांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित ५४ कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.भाटघर धरणग्रस्तांच्या नागरी सुविधांसाठी व विकास कामांसाठी ना भूतो ना भविष्यते असा भरघोष निधी मंजूर झाल्याने थोपटे यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.