सोमेश्वर आयसीयु हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी व मोफत मुतखडा शस्त्रक्रिया शिबिराची नावनोंदणी सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त   सोमेश्वर आयसीयु अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वाघळवाडी येथे आरोग्य तपासणी व  मोफत मुतखडा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
              दि १२डिसेंम्बर २०२१ रोजी हे शिबीर होत असून, दि. १२ नोव्हेंबर २०२१ पासून नावनोंदणी सुरू होत आहे. सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे शिबिर संपन्न होत आहे. तरी परिसरातील नागरिकांनी सकाळी १० ते ३ या वेळेत हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी करावी असे आव्हान हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
To Top