भोर ! भोलावडेत रिक्षा व चारचाकीच्या भिषण अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
दिवसभर शेतात भात कापणी चे काम करून घरी परतत असताना भोर- पुणे महामार्गावरील भोलावडेेे                 (बुवासाहेबवाडी ) येथे रविवार दि.१४  सायंकाळच्या वेळी भोर कडुन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मोटार नं.एम एच ४ सिडी ३०३८ या वाहनाने भोरच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील तरुण शांताराम(सुरेश) शंकर चव्हाण वय- ३५ रा.बाजारवाडी- धावडी याचा जागीच मृत्यु झाला.                   
      या भीषण अपघातात मुलगी  पायल वय -१४ हिचा चारचाकी पायवरुन गेल्याने तीचा पाय तीन ठिकाणी मोडला आहे. तर मुलगा प्रणव वय -१३ व त्याची आत्या मंदाबाई दानवले वय -३३ व  रिक्षा चालक संजय दानवले गंभीर जखमी झाले असून या विषयाची खबर भोर पोलिसांना मृताचा भाऊ महेश शंकर चव्हाण यांनी दिली. भोर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शांताराम शंकर चव्हाण हे त्याचे पत्नी व मुलांसह भात काढणीसाठी त्याचे आत्याकडे मोहरी  ता.भोर येथे गेले होते. अपघातग्रस्त मोटारीची नंबर प्लेट रिक्षाला आडकली असल्याचे घटनास्थळी पोलिसांना मिळाली असून ही मोटार गाडी शहापुर ठाणे येथील असल्याचे निष्पन्न झाले आह. या गुन्ह्याचा पुढील तपास भोर पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक बळीराम सांगळे करीत आहेत.

To Top