बारामती ! गोरे होमगार्ड च्या कुटुंबियांना वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनची आर्थिक मदत

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये नेमणूकीस असेलेला मासाळवाडी (ता. बारामती) येथील होमगार्ड प्रशांत गोरे याचे ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले होते. प्रशांत गोरे यांच्या कुटूबाला एक आर्धिक मदत म्हणून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडेसाहेब यांच्या हस्ते रोख रक्कम 75 हजार रुपये मदत म्हणून देण्यात आली. यावेळी गोरे यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
 यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलिस नाईक पानसरे, पत्रकार काशिनाथ पिंगळे, पत्रकार सुदमराव नेवसे,  पत्रकार चिंतामणी क्षिरसागर, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मूरलीधर ठोंबरे, बाबूर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, बोरकरवाडीचे पोलिस पाटील राहूल बोरकर, राजकुमार लव्हे, सूरज शिंदे, मासाळवाडीचे पोलिस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
To Top