सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
प्रत्येक नागरीकाच्या जगण्याचा आधार असलेल्या राज्यघटनेतील किमान तरतुदी प्रत्येकाने वाचल्या पाहीजेत असे मत ॲड गणेश आळंदीकर यानी सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त केले .
संविधानाची ओळख व तरतुदींचे महत्व या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते .
बारामती तालुक्यातील श्री. सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बनसोडे सर ,तंत्रशिक्षण विभागाचे प्राचार्य एस के हजारे सर,सैनिक संघटना कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,बारामती तालुका सोशल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, पत्रकार काशीनाथ पिंगळे ,पत्रकार तुषार धुमाळ ,प्रा .नवनाथ यादव यांचेसह सर्व प्राध्यापक वर्ग यानी प्रत्यक्ष उपस्थीत राहुन तर विद्यार्थी वर्गाने ऑनलाईन च्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थीती लावली .
ॲड आळंदीकर पुढे म्हणाले जगात सर्वात मोठी म्हणुन गणली जाणारी व सलग २ वर्ष ११ महिने ८ दिवस लिहिली गेलेली ही घटना नसुन हा पवित्र ग्रंथ आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे या घटनेचे शिल्पकार असुन यातील परिशीष्ठ व कलमांचा जगताना पावलोपावली आधार ठरतो. यातील मुलभुत हक्क ,कलमे ,तरतुदी याबाबत माहीती देवुन घटनेत झालेल्या बदलांची माहीती,वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल याबाबत ॲड.आळंदीकर यानी विश्लेषण केले .
प्राचार्य धनंजय बनसोडे यानी घटनेचा अभ्यास काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले .
कार्यक्रमाच्या सुरुवातील २६/११ च्या मुंबई दुर्घटनेतील हुतात्मा हेमंत करकरे ,सोळसकर व ओंबाळे व ईतर वीराना श्रद्धांजली वाहुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली. त्यानंतर संविधान उद्देशीकेचे वाचन प्रा पाचुकांत होळकर यानी केले.प्रा मयुरी यादव यानी सुत्रसंचालन केले व आभार प्रा. नवनाथ भोंग यानी मानले .
COMMENTS