भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ : पोलीस निरीक्षक महेश ढवाण

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर  टिम - - - -
माळेगाव दि २६
   भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून त्याची घरोघरी पारायणे झाली पाहिजेत असे प्रतिपादन तालुका पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले. संविधान प्रती व खाऊ वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने भारतीय संविधान दिन एस.एस.एम.हायस्कुल व ज्यु.कॉलेज येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.यावेळी माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य संजय भोसले, डॉ.निलकंठ ढोणे,सपोनी राहुल घुगे यांनी मनोगत व्यक्त केले.
  यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे,माजी सरपंच जयदीप तावरे, प्राचार्य दत्तात्रय धुमाळ,अनिल दणाणे,प्रा.गणेश खरात, अजित आत्तार, लक्ष्मण भोसले, दत्तात्रय सोनवणे,सोनाली शहा, डॉ.कल्याणी सारफळे  आदी उपस्थित होते.
  यावेळी परफेक्ट महिला पोलिस अॅकडमी, एम.बि.ए.कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला बचत गट  यांना मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रती देण्यात आल्या.तसेच बसपाचे महासचिव रोहित लोंढे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
  सदर कार्यक्रमाचे आयोजन योगेश भोसले, विश्वास भोसले, दादा सोनवणे, संजय वाघमारे,निहाल भोसले, संग्राम भोसले यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भोसले तर आभार प्रकाश धुमाळ यांनी मानले.
 दरम्यान नगर पंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे,माजी सरपंच दिलीप तावरे, प्रशांत आडके,  कामगार संघटनेचे राजू शेख, शंकर ठोंबरे, सुरेश सावंत, विकास जाधव  सेहवाग सोनवणे,आबा चव्हाण आदी उपस्थित होते.
  संविधान प्रती वाटण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल दणाणे व आरोग्य सहायक अजित आत्तार यांचे विशेष कौतुक मान्यवरांनी केले.
      
To Top