सासवड येथील किल्ले स्पर्धेत विजयदुर्ग किल्ल्यास प्रथम क्रमांक

Pune Reporter

 

 सासवड दि २६

 सासवड येथे केक स्टोरी डेझहर्ट यांच्यावतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 213 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.  
     जयदीप मंगल कार्यालयाजवळील मोरया हाइईट्स ग्रुपच्या विजयदुर्ग किल्ला प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना ७ हजार७७७ रुपयांचे रोख बक्षीस मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
   विजयदुर्ग किल्ला बनविणाऱ्या मुलांमध्ये चैतन्य कुंभारकर, श्रुतिका पोमण, साहिल कामठे, शुभम शिंदे, सोहम खेडेकर ,ज्ञानेश्वर नवले यांनी आकर्षक किल्ला बनवला होता. या सर्व मुलांना रावडेवाडी शाळेचे आदर्श शिक्षक नानासाहेब कुंभारकर यांनी मार्गदर्शन केले.
 
To Top