मोठी बातमी ! जिल्हा परिषद शाळापाठोपाठ निवासी आश्रमशाळा सुध्दा होणार उद्याच चालू : मंत्री विजय वडेट्टीवार

Pune Reporter



तांडा वस्तीच्या विकासासाठी निधीची वाढीव तरतूद करणार .

मुंबई, दि.३० : 
बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरु असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या मुला-मुलीसाठी चालविल्या जाणाऱ्या निवासी, अनिवासी आश्रमशाळांमधील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या आश्रमशाळा  १ डिसेंबर रोजी सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व शहरी भागातील महापालिका हदीतील इयत्ता चौथीचे वर्ग असलेल्या शाळा दि. ०१ डिसेंबर, २०२१ पासून सुरु करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.

त्यास अनुसरून या विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आश्रमशाळा तसेच (वसतीगृहासह) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवासी व अनिवासी आश्रमशाळांनी, कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री.वडेट्टीवार यांनी केल्या आहेत.
To Top