सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास , क्रिडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री सुनील केदारसो दिपावली निमित्ताने मयुरेश्वराचे दर्शन घेतले . यावेळी त्यांनी श्रींची अभीषेक पुजा करुन कोरोना मुक्त राज्य होण्यासाठी मयुरेश्वरास प्रार्थना केली .
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काल दि . १ रोजी रात्री ९ वाजता मयुरेश्वराचे दर्शन घेतले . यावेळी बारामती तालुका क्रीडा अधीकारी जगन्नाथ लकडे , पुणे जिल्हा सरचिटणीस विरधवल गाडे , बारामती तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष वैभव बुरुंगले , कॉंग्रेसचे ईंदापुर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत , माळशिरस युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सौरभ रुपनवर , आबासाहेब निंबाळकर ,तालुका पशुधन विस्तार अधीकारी रमेश पाटील , मोरगाव पशुधन विस्तार अधीकारी औंदुबर गावडे उपस्थित होते .आवेळी वरील मान्यवरांनी केदार यांचा सत्कार केला .तसेच चिंचवड देवस्थानचे विश्वस्त विनोद पवार यांनी केदार यांचे श्रींची प्रतीमा व शाल देऊन स्वागत केले .
मंत्री सुनील केदार यांनी मयुरेश्वराची अभीषेक पुजा करुन आरती केली उपस्थीतांना त्यांनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या . मयुरेश्वर पुजा झाल्यानंतर त्यांनी कोरोनामुक्त राज्य होवे व राज्यात सुबत्ता यावी यासाठी प्रार्थना केली .