खेड ! वाफगाव येथे ३ डिसेंबर ला महाराजा यशवंतराव होळकर यांची २४६ जयंती होणार साजरी.

Pune Reporter


बारामती दि २८
महाराजा यशवंतराव होळकर यांची २४६ जयंती ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वाफगाव ता.खेड जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे,  शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे, भूषणसिंह राजे होळकर इतिहास संशोधक संजय सोनवणी, पुणे जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, डॉ अर्चना पाटील, डॉ उज्वलाताई हाके, सुरेश कांबळे  इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कारकिर्दीमध्ये १८ लढाया झाल्या यामध्ये एकही पराभव झाला नाही, त्यांचा जन्म वाफगाव येथे झाला आहे, त्यानिमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला जातो यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव येणार असल्याचे महासचिव भगवान जऱ्हाड, बापुराव  सोलनकर, संपतराव टकले, चंद्रकांत वाघमोडे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
To Top