पूर्वशीच्या लग्नात खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा 'लंबोर्गिनी' डान्स पाहिलात का..व्हायरल व्हिडिओ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मुंबई - राजकीय व्यक्तींना आपण नेहमी सभा,
समारंभ, मोर्चे, बैठका आदींमध्ये बघतो. पण,
त्यांच्या खासगी आयुष्यात किंवा त्यांच्या कौटुंबिक
समारंभात त्यांची छबी काही वेगळीच असते.


असाच काहीसा अनुभव सध्या येत आहे. शिवसेना
नेते आणि खासदार संजय राऊत यांची कन्या
पूर्वशी हिचा उद्या विवाह संपन्न होत आहे. त्यापूर्वी
आयोजित समारंभाला अनेक नेत्यांनी व
मान्यवरांनी हजेरी लावली. याचवेळी खासदार
राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार
सुप्रिया सुळे यांचाही डान्स रंगला. त्याचा एक
व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला
आहे.पवईतील एका सप्ततारांकीत हॉटेलमध्ये हा
सोहळा सुरू आहे. बघा या दोन्ही नेत्यांच्या डान्सचा
व्हिडिओ
To Top