बारामती ! पळशी येथील सारसम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कोरोना लसीकरण शिबिर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पळशी (ता.बारामती) येथील सारसम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयांमध्ये डी. फार्मसी व बी.फार्मसीच्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मिशन युवा स्वास्थ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र लोणीभापकर यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. 
       कोरोनाच्या दीर्घ सावटानंतर राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबर २०२१ पासून पुन्हा सुरू करण्यात आलेली आहेत. प्रशासनाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेशाची परवानगी दिली आहे. परंतु अजून काही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने मिशन युवा स्वास्थ अभियान २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ दरम्यान राबविण्यात येत असल्याची माहिती प्राचार्या सुचेता भिसे यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिली. 
    यावेळी संस्थापक अध्यक्ष नागेश गवळी, प्रा. डॉ. शरद कदम, लोणी भापकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज माने, आरोग्य सहाय्यक रमेश जाधव, आरोग्य सेविका छाया शिंदे, आशा सुपरवायझर राणी धायगुडे, आशासेविका वर्षा कडाळे, वैशाली गडदे, कविता कुंभार, तसेच माधुरी मोरे, वर्षा कदम, बबलू कोळेकर, रणजित वाबळे उपस्थित होते.

To Top