सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने बारामती तालुक्यातील मुर्टी मधील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली असून रुग्णांना याचा फायदा होणार आहे या रुग्णवाहिकेचा मुर्टी प्राथमिक केंद्र व वाकी उपकेंद्र या गावातील अंतर्गत येणाऱ्या गावातील रुग्णांना फायदा होणार आहे मुर्टी व वाकी येथील रुग्णांची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने सुसज्ज अशी रुग्णवाहिका देण्यात आली या रुग्णवाहिकेचे पूजन जि.प.पुणे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लालासाहेब नलावडे,बाळासो जगदाळे,मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे, मोराळे माजी सरपंच निलेश मासाळ,तुळशेराम कारंडे, प्रा. आ.केंद्र मुर्टीचे वैद्यकीय अधिकरी डॉ. अतुल वाबळे, डॉ.मिलिंद यादव, वाकी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सलीम मुलानी व सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.