सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणी भापकर : प्रतिनिधी
संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत लोणी भापकर व भीम ज्योत तरुण मंडळ लोणी भापकर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी भारतीय घटनेचे निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच रवींद्र भापकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी भापकर मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी भापकर मॅडम यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून संविधानाच्या संबंधित चित्रे काढून आणली होती.
त्यात विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता.
यावेळी भापकर मॅडम, यादव मॅडम कुंजिर मॅडम व विद्यार्थी कोरणा चे नियम पाळून उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच भापकरबोलताना म्हणाले की संपूर्ण भारत देश हा संविधानाने चालत आहे संविधानाने आपले अधिकार हक्क आणि जबाबदारी निश्चित केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य पद्मनाथ कडाळे ,संजय सूर्यवंशी ,प्रदीप गोलांडे ,ग्राम विकास अधिकारी श्री चांदगुडे, चेतन मोरे, महेश भंडलकर,व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS