बारामती ! निंबुत येथे दोनशे लिटर गावठी दारू व रसायन जप्त : वडगाव निंबाळकर पोलीसांची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----  
निंबुत येथे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार पोलीस हवालदार नागटिळक पोलीस नाईक बोराडे पोलीस नाईक जाधव यांनी निंबुत येथे  प्रकाश जयसिंग नवले व त्याचा मुलगा प्रमोद प्रकाश नवले राहणार नींबूत तालुका बारामती जिल्हा पुणे यांचे विद्यारित्या दारू हातभट्टी विक्री करीत असताना तिथे छापा घालून हातभट्टी दारू जप्त करण्यात आला असून त्यामध्ये एकूण दोनशे लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व कच्चे रसायन असा एकूण अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच प्रकाश जयसिंग नवले व प्रमोद प्रकाश नवले राहणार निंबुत तालुका बारामती यांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले आहे
         वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.  गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.
To Top