भोर ! अंबाडखिंड घाटात वाघोबांच्या दर्शनाचे सत्र सुरूच ..नागरिक, गुराखी, वाहनचालक भयभीत : वनविभागाचे दूर्लक्ष

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील आंबडखिंड घाट,वरवडी-पाले ता.भोर परिसरात मागील दोन महिन्यांपासून वाघोबांनी तळ ठोकल्याने वारंवार  नागरिक,वाहनचालक,गुराखी यांना वाघोबांचे दर्शन होत आहे यामुळे सद्या परिसरात भितीचे वातावरण आहे.
     आंबाडखिंड ता.भोर घाट परिसरात वाघोबांनी दोन महिन्यांच्या मुक्कामाच्या कालावधीत २ बकरे,शेळी,गायीचे कालवड यांच्यावर हल्ला करून ठार मारल्याने तसेच २ शेळ्या जखमी केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच वारंवार घाट रस्त्यावर प्रवास करताना वाहनचालकांना वाघोबा दर्शन देत असल्याने वाहनचालक घाटातून प्रवास करताना घाबरून जात आहेत.वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून वाघोबांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आंबडखिंड घाट परिसरातील नागरिक व वांहनचालकांकडून होत आहे.

To Top