बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये बिबट्याचे दर्शन : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर मुढाळे  रोड  जाधव वस्ती येथे सोमवारी दि.29 रोजी रात्री च्या आठच्या सुमारास बिबट्या दिसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी मगरवाडी,सोरटेवाडी, चौधरवाडी याठिकाणी  वावर असल्याचे निदर्शनात आले होते. रात्रीच्या सुमारास शेतकरी लोक वाड्या-वस्त्या वरील राहणारे रात्रीच्या वेळी शेतीपंप चालू करण्यासाठी शेतात जातात या वेळी लोकांना बिबट्या असल्याचे समजल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. रात्री आठच्या सुमारास सागर यादव,डॉ.यशवंत देवकर सुभाष राऊत,हनुमंत राऊत अनिल जाधव यांनी मुढाळे रोड जाधव वस्ती या ठिकाणी पाहिला . तसेच यांनी तातडीने सर्वांना फोन करून सतर्क राहण्यासाठी सांगितले. तसेच पोलीस स्टेशन वन वन विभाग यांना फोन करून संरक्षणासाठी मदत मागितली. तातडीने मदत म्हणून वन विभाग अधिकारी प्रकाश चौधरी,योगेश कोकरे, अविनाश नाईक यांनी पाहणी केली असता तर पायाचे ठसे व शेतकऱ्यांचे नुकसान पाहतात हा बिबट्याचा आहे सांगितले आहे. व सर्वांना सतर्क राहण्यासाठी आव्हान केले.. वन विभाग अधिकारी यांनी विजय दरेकर, सुभाश दरेकर संदीप दरेकर व इतर ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी खबरदारी घ्यायची कशी याचे सल्ले दिले..
 बॅटरी ( टॉर्च )वापर करणे.
रात्रीच्या वेळी आवाजाचा वापर करणे.
 हातामध्ये काठी घेऊन फिरणे.
 पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठा करणे.
 रात्री अंगणात अथवा शेतात झोपू नये.
 रात्रीच्या वेळी लहान मुले व वृद्ध यांना एकटे सोडू नये.
 तसेच ऊस तोडी कामगारांना ऊस तोडणी करताना सतर्क राहण्याचे सांगितले आहे.
 यावेळी सर्व ग्रामस्थांनी वन विभागाला विनंती केली की आपण लवकरात लवकर सापळा लावून बिबट्याला बंदिस्त करावे अशी विनंती केली.
To Top