सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरात स्वराज्यभुमी प्रतिष्ठानच्या वतीने कबड्डी लिगचा महासंग्राम धुमधडाक्यात पार पडला.एकुन ६ संघांनी सहभाग घेतला होता.भोर तालुक्यात पहिल्यांदाच भोर-वेल्हा कबड्डी लिगचे सामन्याचे शहरातील नगरपलिका शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. स्वराज्यभुमी प्रतिष्ठानचे कबड्डीचे पहिले पर्व क्रिडाप्रेमी खेळाडू यांचे मन जिंकणारे ठरले. या स्पर्धेसाठी एकूण ६ संघ मालकांनी आपले संघ या रणसंग्रामात सहभागी केले होते. यात प्रविण ढवळे,नितिन दामगुडे यांचा घेवडेश्वर मावळा वॉरीयर्स तर बाळाभाऊ मांगडे यांचा ओम फायटर्स, चेतन मांगडे व अजय करंजकर यांचा राजगड ट्रेकर्स,राहुल चव्हाण डॉ.बाबू चव्हाण यांचा दिलदार योध्दा ,निलेश जेधे यांचा तोरणा हिटर्स ,सॉलिसिटर प्रसाद शिंदे यांचा मल्हारी मार्तंड या नावाने संघ मैदानात उतरले होते.दि. १ डिसेंम्बर ला सर्व संघ व खेळाडूंनी व आयकॉन प्लेयरने औक्षणाला उपस्थित राहून संघ निवड केली होती आणि शुक्रवार व शनिवार या दिवशी संत गाडगेबाबा प्राथमिक मैदानावर हा कबड्डीचा थरार पाहाण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांचे हस्ते स्पर्धेचे उदघाटन करुन स्पर्धेला सुरवात झाली.आमदार संग्राम थोपटे यांनी सामन्यांसाठी प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक दिलेले.तर रामचंद्र आवारे यांनी द्वितिय क्रमांकाचे पारीतोषिक दिलेले.त्तृतीय क्रमांकाचे पारीतोषीक आयोजक स्वराज्यभुमी प्रतीष्ठानने यानी दिले.सदर स्पर्धाना आमदार संग्राम थोपटे,भोर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे,जिल्हा परिषद सदस्य विठठल आवाळे,नगरसेवक बाळा धनकवडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी अनिल सावले प्रसाद शिंदे किरण चव्हाण,राजीव केळकर प्रसाद वाधमारे,विठोबा शिंदे,नितिन दामगुडे,रामचंद्र आवारे,चंद्रकांत मळेकर,बजरंग शिंदे,महेश शेटे,आप्पा मळेकर बाळासो घोलप युवराज रेणुसे,अमर बुदगुडे व स्वराज्यभुमी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.