बारामती ! मुर्टी येथे सर्वस्पर्शी फाऊंडेश या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या बारामती तालुका युनिटचे उद्घाटन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कल्याणी जगताप 
 मुर्टी- मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळा येथे सर्वस्पर्शी फाऊंडेश महाराष्ट्र राज्य पुणे या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या बारामती  तालुका युनिटचे उद्घाटन  शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आले.
           महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे  यांच्या शुभहस्ते संपन्न झाला याप्रसंगी सर्वस्पर्शी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेचे संस्थापक डॉ. पोखरणीकर संस्थेचे सचिव डॉ संस्थेचे सचिव महादेव रोकडे संस्थेचे सहसचिव: डॉ समिंदर घोक्षे महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे प्रतिनिधी कांचन निगडे पुरंदर महिला उपाध्यक्ष माननीय कोमल निगडे ग्रामपंचायत सरपंच मंगल खोमणे स्कूल कमिटी सदस्य  बाळासाहेब जगदाळे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था लालासाहेब नलावडे राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचा adv. सुप्रिया बर्गे सोबत आणि अनिता चौरे राज्याचे उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त  किसनराव पवार सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष  बाळासाहेब जाधव माजी सरपंच मोडवे वैभव मोरे व इतर सदस्य उपस्थित होते.
     सूत्रसंचालन महादेव रोकडे यांनी केले तर महानवर यांनी आभार मानले आश्रम शाळेतील मुलांना सँनीटायजर मास्क हिवाळी कानटोप्या व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला या सगळ्याचे नियोजन सर्वस्पर्शी फाऊंडेशनचे बारामती युनिट यांनी केले. यामध्ये अध्यक्षा सारिका तांबे. सचिव अश्विनी तांबे सचिव सीमा भोसले जनसंपर्क अधिकारी नीलम खोमणे व खजिनदार बाबू चव्हाण व संदीप जगदाळे  यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळा येथील सर्व शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.
To Top