भोर ! माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १०१ रक्तदात्यांचे रक्तदान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोरला शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी १०१ रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान समजून रक्तदान केले.

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करून पार पडले.शिबिरात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,सभापती लहू शेलार,पीडिसिसी संचालक भालचंद्र जगताप,शहराध्यक्ष नितीन धारणे,चंद्रकांत बाठे,यशवंत डाळ,गणेश खुटवड,मनोज खोपडे,पार्थ रावळ,सुहित जाधव,शाम गोळे,मयूर भालेराव,विक्रम शिंदे आदींसह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.




     
To Top