सोमेश्वर रिपोर्टर टीम - - -
सोमेश्वरनगर दि १२
मागील काही महिन्यांपासून बारामती तालुक्यातील वाघळवाडी व करंजे वनविभाग हद्दीमध्ये सरास अवैधरित्या वृक्षांची तोडणी केली जात अाहे.रातोरात झाडांची विल्हेवाट लावली जात आहे.ना कर्मचारी ना अधिकारी कोणीही या विनभागात फिरकत नाही.आणि जरी चुकून एखादा फेरफटका मारला तर ती धावती भेट असती आणि या वृक्षतोडीवर डोळेझाक केली जाते आहे . वनविभागात जोमात चाललेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अवैध वृक्षतोडीची बाब समोर आल्यानंतर केवळ गस्त घालण्याचा बागुलबुवा उभा केला जातो.पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होत असल्याने वाघळवाडी वनपरिक्षेत्रातील वृक्ष नामशेष होण्यास वेळ लागणार नाही असे वन्यप्रेमींनीकडु सांगण्यात येत आहे .
शासनाकडून पावसाळय़ामध्ये वृक्षसंवर्धन व लागवडीसाठी प्रोत्साहन देत अनेक कार्यक्रम हाती घेतले जातात त्या वनविभाग हद्दीमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली जात असते .पण या लागवड केलेल्या वृक्षांची जितकी काळजी घ्यायची गेरजेचे तितकी घेत नसल्याचे चित्र वाघळवाडी विभाग हद्दीमध्ये दिसत आहे .या वनविभाग हद्दी परिसरामध्ये झाडांची ज्वलनाच्या लाकडांसाठी इतर कामांसाठी वृक्षांची अवैद्य रीतीने तोडणी केली जात असल्याचे दिसत आहे .या संरक्षित वन परिसरात वृक्षांचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड थांबविणे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करणे दोन्ही प्रशासनाकडून अपेक्षित आहे .पण दोन्ही विभागाचे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे पर्यावरण प्रेमींकडून खंत व्यक्त केली जात आहे .
अधिकाऱ्यांना खुर्ची सोडवेना आणि कर्मचाऱ्यांना घर सुटेना !
वाघळवाडी व करंजे येथे शेकडो एकर पसरलेला वनविभाग परिसर आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी आपलं कर्तव्य ऑफिसमधून बसून निभावत आहेत आणि विभागातील कर्मचारी तर आठवड्यातून फक्त एक दोन वेळा धावती चक्कर मारतात तेही दुचाकीवरून.या सर्व प्रकारामुळे अवैध काम करणाऱ्यांवर वचक राहिलेला नाही .