सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्यात सर्वच घटकांच्या चांगल्या समन्वयामुळे कारखान्याची प्रगती होताना दिसत आहे. सभासदांनी चांगल्या प्रतीचा पिकवकेला ऊस कारखान्यावर आणण्याची मोठी जबाबदारी ऊस वाहतूक संघटना पार पाडत असल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता बारामती येथे ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेने चालकांना ५५० जर्किंग चे वाटप करण्यात आले. यावेळी जगताप बोलत होते. कार्यक्रमात देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष
अनंदकुमार होळकर, संचालक सुनील भगत, लक्षण गोफणे, ऋषी गायकवाड, प्रविण कांबळे, संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, सचिव प्रभाकर जगताप, कैलास मगर, राजेश जगताप, सचिन टेकवडे, संजय जगताप, सागर वायाळ, विजय थोपटे, संदीप साळुंखे, जालिंदर सावंत, निलेश ताम्हणे, हेमंत माळशिकारे आदी मान्यवर उपस्थित होते. जगताप पूढे म्हणाले, ऊसदर उचल असेल किंवा वाहतूक संघटनेच्या काही मागणी कारखान्यात होत असतात मात्र कायम कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेऊन वाटाघाटी करत कारखाना प्रशासनाने
संघटनेला चांगली साथ दिली आहे. संघटनेतील चालक अडचण आला तर त्याला मदत करण्याचे काम संघटना करत असते. आज वाटप केलेली ५५० जर्किंग असो किंवा मागील कोविड मध्ये २ लाख तसेच पारनेर येथील कोविड सेंटरला २५ हजार,
गेल्या वर्षीचे ब्लॅंकेट वाटप असो की चालकांना आर्थिक मदत असो संघटनेचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून सद्या सोमेश्वर कारखाना दररोज ६ हजार ७०० मे. टन पर्यंत गाळप करत असून जानेवारीत विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर दररोज ८ हजार ५०० मे टनाने चालवण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन युवराज शिंदें यांनी केले तर नितीन जगताप यांनी आभार मानले.