बारामती ! काटेवाडीत पवार साहेबांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-- ---
काटेवाडी : प्रतिनिधी  
काटेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . काटेवाडी येथील संत तुकाराम महाराज पालखी ओटा येथे ज्येष्ठ्र नागरिकाच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी अनेकांनी पवार साहेबा विषयी मनोगत व्यक्त केले १९६७ पहिल्या विधानसभा निवडणुक लढवली गेली त्यावेळची परस्थिती व अनुभव सुद्धा ज्येष्ट्रानी सागितले. शरद पवार साहेब हे देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नाव आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे  ज्येष्ठ नेते आणि संस्थापक आहेत. त्यांनी आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी अनेक मोठ्या जबाबादाऱ्या संभाळल्या असल्याचे संरपच विद्याधर काटे यांनी सागितले तर   शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन्‌ दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार साहेब यांनी देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे.आज 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस  आहे. वयाची ऐंशी ओलंडल्यानंतरही पवार आज राज्याच्याच नव्हेत तर देशाच्या राजकारणात  पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडी गेली दोन वर्षे भक्कम उभी आहे . तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आजही पवारांमध्ये असल्याचे छत्रपती चे अध्यक्ष प्रंशात काटे यांनी सागितले.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज काटेवाडी गावात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . काटेवाडी येथील संत तुकाराम महाराज पालखी ओटा येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे ज्येष्ठ्र नागरिक संघाच्या वतीनेआयोजन करण्यात आले होते .

यावेळी छत्रपती चे अध्यक्ष प्रंशात काटे, संरपच विद्याधर काटे, महाराष्ट्र राज्य डांळीब उत्पादक संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब काटे, ग्रामपंचायती चे सदस्य श्रीधर घुले,सोसायटीचे अध्यक्ष संजय शेळके, माजी अध्यक्ष अनिल काटे, अजित काटे, प्रकाश काटे,बाजार समितीचे माजीअध्यक्ष संजय काटे, बारामती तालुका कुस्तीगर संघाचे उपाध्यक्ष दिलीपराव काटे, तंटामुक्ती चे अध्यक्ष के टी जाधव, दतात्रय काटे, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रकाश ठेंगले, द्राक्ष बागायदार संघाचे माजी संचालक शितल काटे,  विद्या प्रति ष्ट्रान शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारूती काटे,  अमर जगताप ,पोलिस पाटिल, सचिन मोरे, राजेंद्र सोलनकर, अशोक जाधव,  अदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
To Top