सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वाणेवाडी ता बारामती येथे ड्रोनच्या साहाय्याने पिकावर औषध फवारणीचे प्रात्यक्षिक होणार आहे.
याबाबत कारखान्याने काढलेल्या परिपत्रकात म्हणटले आहे, कारखान्याचे सर्व सभासदांना कळविणेत येते की, सद्य स्थितीत ऊस पिकावर तांबेरा, लाल ठिपके ह्या रोगाचा व कांडी किड, शेंडेकिड या किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे, त्यामुळे ऊस पिकाचे उत्पादनावर व साखर उता यावर अनिष्ठ परिणाम होत असुन त्याचे नियोजन करणेसाठी वाढ झालेल्या ऊसावरती फवारणी करणे शक्य होत नसुन, वरील किड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
कारखान्याने कार्यक्षेत्रात सभासदांचे शेतावर ड्रोनच्या सहाय्याने फवारणीचे प्रात्यक्षिक घेणेचे नियोजन केलेले आहे. चेतक इनोव्हेशन कंपनी, इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली या कंपनीचे उभ्या ऊस पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक खालील ठिकाणी ठेवणेत आले आहे. तरी जास्तीत जास्त सभासदांनी सदर प्रात्येक्षीक पहाणेसाठी उपस्थित राहुन माहिती घ्यावी, ही विनंती.
ठिकाण :- किरण उत्तमराव भोसले यांचा प्लॉट प्रा. आरोग्य केंद्र / बाजारतळ शेजारी, वाणेवाडी ता. बारामती जि.पुणे
COMMENTS