सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
पंचायत समिती भोरच्या रिक्त झालेल्या उपसभापतीपदी काँग्रेसचे रोहन बाठे यांची बिनविरोध निवड झाली असल्याने तालुका काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण आहे.मात्र सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे तर सदस्य शिवसेनेचा असल्याने सद्या पंचायत समितीत महाविकासआघाडीची सत्ता आहे
राष्ट्रवादीचे उपसभापती लहू नाना शेलार यांची १६ नोव्हेंबरला भोर पंचायत समिती सभापतीपदी निवड झाल्यानंतर उपसभापती पद रिक्त होते. त्यानंतर शुक्रवार दि.१० उपसभापती पदाची निवडणूक निर्णयअधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या उपस्थितीत पार पडली. काँग्रेसचे रोहन बाठे यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला .त्यावर शिवसेनेच्या पुनम पांगारे विध्यमान सभापती लहूनाना शेलार यांनी सूचक म्हणून सह्या केल्या त्यानंतर उपसभापती पदासाठी कोणीही उमेदवारी अर्ज भरला नसल्याने काँग्रेसचे रोहन बाठे हे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले.
रोहन बाठे यांची उपसभापती बिनविरोध निवड झाल्यानंतर भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे,जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, उपनगराध्यक्ष अमित सागळे,नगरसेवक चंद्रकांत मळेकर, सुमंत शेटे, जगदीश कीरवे ,गणेश पवार , रुणाल पवार,विलास बोरगे,अमृता बाठे, गणेश मोहिते, बजरंग शिंदे ,शाम जेधे ,संकेत केळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS