सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मुलांचे अपहरण होण्याची एका महिन्यात दुसरी घटना घडली असल्याने बालकांचे अपहरण करणारी टोळी भोर तालुक्यात सतर्क असल्याचे निदर्शनास येत आहे.यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
भोर शहरात मागील पंधरा दिवसांपूर्वी शाळेत जाणाऱ्या १३ वर्षीय विध्यार्थ्यांस शाळेसमोरून जात असताना ओमीनी गाडीत बळजबरीने ओढत घेत पाय बांधून राजवाड्याच्या पाठीमागे झाडाझुडपात सोडून दिले.तर मंगळवार दि-७ सायंकाळी गवडी ता.भोर येथील १४ वर्षीय सनी सर्जेराव साळुंखे या मुलास शिंद येथे रस्त्याने तालमीत जात असताना ओमीनी गाडीतील दोघांनी सनि यास विचारपूस करीत गाडीत बळजबरीने बसवून चाकूचा धाक दाखविला.मात्र गाडी काही अंतरावर गेल्यावर गाडी थांबताच सनीने सतर्कता राखीत गाडीतून पळ काढला.अंधाराचा फायदा घेत सनी भल्यामोठ्या रस्त्याकडेच्या गवतात लपून बसला.गाडी गेल्यानंतर सनी घरी परतला व घरच्यांना पूर्ण हकीकत सांगितली.मात्र याची फिर्याद पोलिसात दाखल झालेली नाही.