बारामती ! तरडोली सरपंच निवड कोरम अभावी तहकूब : एकमेव अर्ज आल्याने विद्या भापकर यांची सरपंच पदावर वर्णी ?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : तरडोली ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड  जिल्हाधीकारी यांच्या आदेशानुसार आज संपन्न होणार होती . या पदासाठी चार सदस्यांपैकी केवळ विद्या हनुमंत भापकर यांचा एकमेव  अर्ज आला होता . तर  पाच सदस्य या निवडीसाठी  गैहजर राहील्याने सभा तहकुब करून उद्या पुन्हा २ वाजता होणार आहे . यासाठी गणपुर्तीची आवश्यकता नसल्याचे निवडणुक निर्णय अधीकारी डी. एस . कोरपड  यांनी  सदस्यांना नोटीशीद्वारे सूचीत केले आहे.


आज तरडोली येथे सरपंचपद निवड  कार्यक्रम नाट्यमय रीत्या संपन्न झाला . येथील तत्कालीन  सरपंच नवनाथ जगदाळे यांच्या निवड प्रक्रियेवर  पाच सदस्यांनी जिल्हाधीकारी यांकडे अपील केले होते . जिल्हाधीकारी यांनी   निवडणूक निर्णय अधीकाऱ्यांने  वैध ठरणारे मत चुकीच्या रीतीने अवैध ठरविल्याने  जगदाळे यांची निवड प्रक्रीया रद्दबातल ठरवली होती . यानंतर   आज  दि ९ रोजी  पुन्हा  नव्याने सरपंच निवड प्रक्रिया कार्यक्रम घोषित करण्यात आला होता .  सकाळी १० वाजून ३२ मिनीटांनी  विद्या  हनुमंत भापकर , संतोष  संपत चौधरी , स्वाती सतीश गायकवाड , नबाबाई  धायगुडे  यांपैकी  सरपंच पदासाठी विद्या भापकर यांचा केवळ एकमेव अर्ज आला . या निवडीसाठी नवनाथ  जयसिंग जगदाळे , महेंद्र जिजाबा तांबे ,  सागर पंडीत जाधव , अनिता उत्तम पवार , अश्विनी श्रीकांत गाडे हे गैहजर राहीले .

दुपारी अडीच वाजेपर्यंत  नामनिर्देशित भरणे , अर्ज माघार घेणे , छाननी ही प्रक्रीया संपन्न झाली .मात्र गणपुर्ती अभावी  निवडणूक निर्णय अधीकारी डी.एस.कोरपड यांनी  सभेचे  कामकाज उद्या दि .१० रोजी दुपारी २  वाजता ठेवले आहे . तसेच यासाठी गणपुर्तीची आवश्यकता नसुन  निवडीची पुढील प्रकीया संपन्न  होणार असल्याचे  नोटीशीद्वारे सदस्यांना त्यांनी कळविले  आहे .गैरहजर सदस्यांमुळे विद्या  भापकर यांचा  सरपंच पदाचा  मार्ग मोकळा झाला आहे .
 
To Top