लोकांना आरोग्यदायी असणारे व शेतीमालाला भाव मिळऊन देणारे स्टार्टअपच देशाचे भवितव्य : शरद पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
 बारामती तालुक्यातील काही तरुणांनी  शेवगा,दुधी भोपळा, अश्वगंधा, गुळवेल  यासारख्या भाज्या व औषधी वनस्पती पासून आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्यदायी सूप अमृतरस बनवले होते.  अमृतरस  सूपमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच  शरीरासाठी आवश्यक असणारे मिनरल्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक  त्याचबरोबर  आवश्यक असणारे व्हिटामिन ए ,सी,बी1, बी3, बी12  योग्य प्रमाणात मिळतात. 
          अमृतरस सुपच्या www.amrutaras.com वेबसाईटचे उद्घाटन माजी कृषीमंत्री  शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर मार्केटिंगसाठी केल्यास उत्पादनांना चांगला फायदा होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.  अमृतरसचे फायदे जाणून घेतल्यानंतर  अमृतरस लोकांसाठी आरोग्यदायी असून  त्यामुळे शेतमालाला भाव मिळणार आहे. तरुणांनी असे नाविन्यपूर्ण प्रयोग व स्टार्टअप  सुरू केले पाहिजेत आणि व्यवसायिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने  काम केल्यास देशाला उज्ज्वल भवितव्य आहे  अशी भावना व्यक्त केली.
 अमृतरसबद्दल माहिती देताना  विक्रम ननवरे यांनी सांगितले की  अमृतरस रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते तसेच पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते.  रक्त शुद्ध करण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रण करण्यातही मदत करते.  रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हाडे मजबूत करणे,  श्वसनाचे विकार कमी करणे, वजन कमी करणे याबरोबरच डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
To Top