बारामती ! पतीला होता प्रॉब्लम.. म्हणून तो पत्नीला ठेवायला लावायचा जबरदस्तीने इतरांशी संबंध : बलात्काराचा गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की तिचा विवाह २०१६ मध्ये  झालेला होता एक वर्षानंतर पतीला लैंगिक समस्या जाणवू लागली. समलिंगी संभोग याकडे त्यांचा कल वाढू लागला. 
         त्यानंतर ते त्यांच्या पत्नीच्या नावे काही लोकांना व्हाट्सअप वर मेसेज पाठवू लागले. त्यांना त्यांच्या घरी बोलून. २०१७ पासून पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्या सोबत शारीरिक संभोग करायला लावून ते पाहण्याचा आनंद घेऊन. स्वतःला उत्तेजित करत असत. त्यांच्या पत्नीने त्यांना वेळोवेळी असे न करण्याबाबत सुनावले होते. परंतु त्यांनी तिचे ऐकले नाही. सहा महिन्यापूर्वी त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला त्यानंतर त्यांनी हा प्रकार बंद केला आता परत त्यांनी सदर त्यांच्या पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध लोकांबरोबर संबंध ठेवण्याबाबत त्यांनी प्रयत्न सुरू केला. यातून सदर महिलेने पोलीस ठाण्यात येऊन पती विरुद्ध व अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्याद दाखल केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी कौशल्य पूर्ण करून सदर पीडित महिलेच्या पतीला व इतर एकूण चार लोकांना असे पाच लोकांना अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपींना एकूण सहा दिवस माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. सदर आरोपींना १५ डिसेंम्बर २१ रोजी न्यायालयीन कोठडी झालेली आहे इतर अटक केलेल्या आरोपींची सदर महिलेकडून ओळख परेड घेण्यात येणार आहे. सदर प्रकाराचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये पूर्ण पडताळणी करूनच आरोपींना अटक केलेली आहे व करण्यात येणार आहे सदरची कारवाई माननीय डॉक्टर अभिनव देशमुख माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक सुनील मोठे पोलीस नाईक संजय जाधव अतुल जाधव दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर तुषार चव्हाण पवार व संपूर्ण तपास पथक करत आहे.
To Top