भोर ! कोतवाल संघटना आक्रमक : तहसीलदार यांना निवेदन देत बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
कोतवाल यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोतवाल संघटनेने दिला आहे. यासाठी भोर तालुका कोतवाल संघटनेने पदाधिकारी व सदस्य यांनी भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले आहे. 

        महसूल खात्यातील तळागाळातील काम करणारा कोतवाल यांनी विविध मागण्या केल्या असून त्या १२ डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १३ डिसेंबर पासून राज्यात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोतवाल संघटनेने दिला आहे.कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी, तलाठी व तत्सम पद भरतीमध्ये २५% आरक्षण देण्यात यावे, सेवा निवृत्त कोतवालांना पेन्शन व वारसांना सेवेत सामावून घ्यावे अशा मागण्या कोतवाल संघटनेच्या असून या मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील १२६३७ कोतवाल बेमुदत आंदोलन मुंबई येथे करणार आहेत.असे भोर तालुका कोतवाल संघटनेचे उपाध्यक्ष किरण सावंत यांनी सांगितले.
To Top