सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. मुगुटराव साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१ डिसेंबर ते ०३ डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
दि. ०१/१२/२०२१ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी " भाषा,साहित्य आणि संस्कृती " या विषयावर कला महाविद्यालय , जेजुरी.चे प्रा.डाॅ.अरूण कोळेकर यांनी विचार मांडले. भाषा,साहित्य आणि संस्कृती या संकल्पना स्वतंत्र असल्या तरी हे हवाबंद कप्पे नाहीत. ते घटक ऐकमेकांना पूरक अाहेत. माणसाला माणूसपण कलांच्या सहवासातच येते. अशी भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सह सचिव सतीशराव लकडे हे होते.
प्राचार्य जवाहर चौधरी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कै.मुगुटराव काकडे देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अाभार डाॅ. देविदास वायदंडे यांनी मानले.सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दि. ०२ / १२ / २०२१ रोजी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी 'स्वातंत्र्य , समता , बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता ' या विषयावर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील राज्यशास्र विभागप्रमुख प्रा.डाॅ.हणुमंत फाटक यांनी व्याख्यान दिले. देशातील सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक पर्यावरण दूषित होत असून संविधातील स्वातंत्र्य , समता, बंधूता , सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी अाज महत्त्वाची झाली अाहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील वैचारिक , सांस्कृतिक वाटचाल त्यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक संजय घाडगे हे होते. त्यांनी कै. मुगुटराव काकडे देशमुख यांनी सहकारी साखर कारखाना कसा निर्माण केला यावर प्रकाश टाकला सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. निलेश आढाव यांनी मानले
दि. ०३ / १२ / २०२१ रोजी व्याख्यानमालेचा तिसरा दिवस या दिवशी ' सामाजिक बांधिलकी आणि समकाल ' या विषयावर विद्या- प्रतिष्ठान महाविद्यालय , बारामती चे प्रा.डॉ. एच. एस. पाटील यांनी विचार मांडले. भारत हा बहुभाषिक , बहुसांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण जीवन जगणारा देश अाहे . प्रत्येक माणसाने दुसर्याचा मताचा , संस्कृतीचा , भाषेचा अादर केला पाहिजे. तसेच अापण समाजाचे काही एक देणे लागतो, समाजाचे स्वास्थ बिघडणार नाही या भूमिकेतून अापले वर्तन असावे असे विचार त्यांनी मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक नितीन कुलकर्णी हे होते. प्राचार्य जवाहर चौधरी यांनी मनोगतात सांगितले की, प्रत्येक माणूस हा समाजाशी उत्तरदायित्व असतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डाॅ. प्रवीण ताटे देशमुख त्यांनी केले.त्यात कै. मुगुटराव आप्पांच्या व्यक्तिमत्त्वाचे पेलू उलगडून दाखविले, . कार्यक्रमाचे आभार डाॅ. संजू जाधव यांनी मानले. याप्रसंगी संस्थेचे संचालक रूषीकेश धुमाळ ,उपप्राचार्य डाॅ. जगन्नाथ साळवे , उपप्राचार्य डाॅ जया कदम , प्रा. रवीद्र जगताप, प्रा. मेघा जगताप, प्रा रजनीकांत गायकवाड महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, सेवक कार्यक्रमास उपस्थित होते.