सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यात १ डिसेंबर रोजी ८७.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आसुन दोन दिवसात संततधार पाऊस व कडाक्याच्या थंडीचा फटका मेंढपाळांना बसला आहे. शेतात उघड्यावर असलेल्या शेकडो मेंढया गारठल्याने दगावल्या आहेत. तर अनेक शेळ्या मेंढ्या आजारी असल्याचे देखील समोर आले आहे. विविध गावात २०४ मेंढया चा मृत्यू झाल्या आहेत. असे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यामध्ये आचानक जोरदार वाऱ्यासोबतच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर थंडीचा कडाका देखील प्रचंड वाढला आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका पुरंदर तालुक्यातील मेंढपाळांना बसला आहे. जवळपास आठ ते दहा गावांमधील मेंढपाळांच्या २०४ शेळ्यामेंढ्या यात दगावल्याने मेंढपाळाचे १,४२,८००० रुपयांचे आंदाजे नुकसान झाले आहे.
आच्यानक आनेक गावांमधून मेंढपाळांचे फोन येऊ लागल्याने ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भर पावसामध्ये जाऊन या मृत शेळ्या-मेंढ्यांचे पंचनामे केले.
शेळ्या मेंढ्यांची गावानिहाय मिळालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे ः भोसलेवाडी ः (४०), वनपुरी (१३), राजुरी (१०), माळशिरस (४), सुपे खुर्द- (१४), वाल्हे (११), टेकवडी (३४) परिंचे (६४) आशा शेळ्या मेंढ्या चा मृत्यू झाला आहे.
------------------------
राज्याचे मुख्यमंत्री व पशुसंवर्धन मंत्री यांना पुरंदर तालुक्यातील २०४ शेळ्या-मेंढ्यांच्या झालेल्या मृत्यू संबंधीची माहितीचे पत्र देणार असून ज्या मेंढपाळांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी मी बोलणार आहे. तर मेढपाळांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
COMMENTS