पुरंदर ! बसच्या धडकेत अकरा वर्षाचा मुलाचा मृत्यू तर सहाजण जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
सासवड हद्दीत पालखी महामार्गावर पांढ-या रंगाच्या लक्झरीच्या धडकेने चारचाकीतील ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर अन्य सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी( दि १ ) दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 
     याबाबत किरण बबन बांगर रा बीरवाडी, ता शहापूर ठाणे यांनी सासवड पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली आहे. याबाबतचे वृत्त असे, बांगर हे दत्तात्रय मुकणे यांच्या रेनॉल्ट कंपनीच्या चारचाकी ( एम एच ०४ के एल ६३९२  ) वर चालक म्हणून काम करीत आहेत. बुधवारी सासवडमार्गे जेजुरीकडे देवदर्शनासाठी जात असताना सासवड हद्दीतील बागवान हॉटेलजवळ पाठीमागून आलेल्या पांढ-या रंगाच्या लक्झरीने जोरदार धडक दिली. यामुळे रेनाॅल्ट गाडी विरुद्ध बाजूला गेली त्याचवेळी जेजुरीकडून आलेल्या चारचाकी ( एम एच ०३ डी जी ९२६९ ) ची धडक रेनॉल्ट गाडीला बसली. लक्झरीच्या जोरदार धडकेने रेनॉल्टमधील ओम दत्तात्रय मुकणे ( वय ११ वर्षे ) याच्या डोक्याला गंभीर इजा, रक्तस्त्राव होऊन जखमी झाला. तर चालक बांगर तसेच मालती दत्तात्रय मुकणे, दत्तात्रय गोविंद मुकणे, प्रकाश बबन हिलम, संगीत प्रकाश हिलम आणि पडू महादू दिवे सर्व रा बीरवाडी, ता शहापूर, जि ठाणे यांना गंभीर इजा झाली. अपघाताच्या ठिकाणी जमलेल्या  लोकांनी ऍम्ब्युलन्स बोलावून सर्वांना सासवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी ओम याला उपचारापूर्वीची मयत झाल्याचे सांगितले. सासवड पोलिसांनी पांढ-या रंगाच्या अज्ञात लक्झरी चालकाच्या विरोधात कलम २७९, ३०४ ( अ  ), ३३७, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 
     दरम्यान, या पालखी महामार्गावरील अर्धवट कामामुळे अशा ठराविक ठकाणी सत्ता अपघात होत आहेत. बागवान हॉटेल जवळ चौपदरी रस्ता एकेरी होत असल्याने येथे सतत वाहने धडकून तसेच चालकाचे नियंत्रण सुटून पलटी होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे आता या मार्गाचे चौपदरीकरणाचे अर्धवट काम पूर्ण करणे तसेच या महामार्गावरील पूर्वीचे अरुंद आणि नव्याने झालेल्या अर्धवट पुलांचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकाकांडून होत आहे. 

To Top